अखेर PM Modi 2000 झाले जमा...

अखेर PM Modi 2000 झाले जमा…

प्रधान मंत्री किसान सन्मान निधीचा १४ वा हप्ता झाला जमा….

Pradhan Mantri Kisan Sanman Yojna

देशातील सर्व पात्र  शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. PM Kisaan सन्मान निधीचा  14वा हप्ता, ज्याची सर्वाव शेतकरी आतुरतेने वाट बघत होते  तो आज २७ जानेवारीला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील सीकर येथे एका सरकारी कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी या योजनेअंतर्गत हा १४ वा  हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला.
१४ व्या  हप्त्याचे 2000 रुपये थेट देशातील 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात DBT द्वारे  पोहोचले आहेत.

PM नरेंद्र मोदी यांनी सीकरमध्ये एका सरकारी कार्यक्रमात अनेक विकासकामांची पायाभरणीही केली आहे. याशिवाय त्यांनी 1.25 लाख किसान समृद्धी केंद्रांचे उद्घाटनही केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील ७  नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची पायाभरणीही केली. यावेळी आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कार्यक्रमाला संबोधित केले.

लाभार्थी यादीतल तुमचे नाव तपासा:- PM kisan Status

PM किसान सन्यामान यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी तुम्हाला पुढील बाबी कराव्या लागतील

 • प्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल.
 • होमपेजवर तुम्हाला Former Corner चा पर्याय दिसेल, इथे
 • आता तुम्हाला लाभार्थी यादीवर वे लागेल
 • पुढील पानावर तुम्हाला राज्य, जिल्हा, गाव इत्यादी माहिती द्यावी लागेल.
 • Get Report वर
 • संपूर्ण तपशील आता तुमच्यासमोर उघडेल

हप्ता न मिळण्याचे कारणे :- PMKSY

 • जर तुम्ही अर्जात चुकीची माहिती दिली असेल.
 • पीएम किसान अंतर्गत कोणतेही आवश्यक कागदपत्र सादर केले नसल्यास.
 • तुम्ही शेतकरी आहात पण शेती तुमच्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावावर आहे, पीएम किसानमध्ये जमिनीची मालकी आवश्यक आहे.
 • दुसऱ्या शेतकऱ्याकडून जमीन घेऊन भाड्याने शेती केली तर.
 • शेतकरी किंवा कुटुंबातील कोणी घटनात्मक पदावर असल्यास.
 • राज्य/केंद्र सरकार तसेच PSU आणि सरकारी स्वायत्त संस्थांचे सेवारत किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी.
 • डॉक्टर, इंजिनिअर, सीए, आर्किटेक्ट, वकील असे व्यावसायिक आहेत.
 • 10,000 रुपये पेक्षा जास्त मासिक पेन्शन आहे.

  वरील माहिती आवडल्यास आपल्या शेतकरी बांधवाना शेयर करा व किसान योजना संकेतस्थळाला अवश्य भेट द्या

Facebook
WhatsApp
Telegram
Email

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *