एक रुपयात पिक विमा | Ek Rupyat Pikvima 2023

एक रुपयात पिक विमा | Ek Rupyat Pikvima 2023

सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे.


नमस्कार शेतकरी मित्रानो ……….


              भारत हा कृषी प्रधान देश आहे हे तर आपल्याला माहीतच आहे व भारतातील बहुतांश लोक शेती व्यवसाय करतात. कुठलाही व्यवसाय करत असताना नफा तोटा तर असतोच परंतु  त्कयाच बरोबर कधी कधी नुकसानही सोसावे लागते शेती या व्यवसायात नुकसानीची सर्वात जास्त जोखीम असते. शेती करताना  पाऊस जास्त आला तर नुकसान, कमी आला तरी नुकसान, ढगफुटी झाली, शेत खचले वीज पडली किंवा नैसर्गिक आग यामूळ शेतीचे कायम नुकसान होताच असते त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण होण्यासाठी केंद्र सरकार “प्रधानमंत्री पिक विमा योजना” “Pradhan Mantri Pik Vima Yojna”  हि योजना राबवणे सुरु केले.

या वर्षी  खरीप हंगाम  २०२३ मध्ये राज्यात १ रुपयात पीकविमा देण्याचे शासनाच्या विचारधीन होते व ते या हंगामापासून लागू झाले आहे येत्या ३० जुलै २०२३ पर्यंत सर्व शेतकर्यांनी आपल्या जवळील CSC केंद्रात अथवा प्रधान मंत्री फसल बिमा योना  https://pmfby.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन स्वतः १ रुपयात पीकविमा भरून घेऊ शकता यापूर्वी  पिक्विमासाठी शेतकऱ्याला काही ठराविक हप्ता भरून पीकविमा भरावा लागत असे परंतु या वर्षी पासून शेतकर्यांना प्रती पिक, प्रती गट क्रमांक म्हणजे एका नोंदीसाठी  १ रुपया प्रमाणे पैसे भरून आपल्या शेतमालाचे संरक्षण करता येणार आहे तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी पीकविम्याची शेवटची तारखेची वात न बघता लवकरात लवकर १ रुपयात पीकविमा काढून घ्यावा असे आवाहन शासनाने सर्व शेतकऱ्यांना केले आहे

पीकविमा साठी कागदपत्रे

१) आधार कार्ड प्रत

२) पासबुक प्रत

३) स्वयंघोषित पीकपेरा

४)) सात बारा आठ अ नक्कल

५) बंधपत्र ( सामुहिक क्षेत्र असल्यास  भाडे तत्वावर असल्यास)

वरील सर्व माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेयर करा. व अशाच नवनवीन माहितीसाठी किसान योजना या संकेत्स्थाला अवश्य भेट द्या

Facebook
WhatsApp
Telegram

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *