गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना | शेतकर्यांना मिळणार २ लाख | Gopinath Mundhe Shetkari yojana

गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना | शेतकर्यांना मिळणार २ लाख | Gopinath Mundhe Shetkari yojana

             राज्यात डिसेंबर २०१९ पासून “गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजना” अमलात आणली होती. परंतु या योजनेत विमा कंपनीकडून लाभार्थी दावे वेळेत निकाली न काढणं, अनावश्यक त्रुटी काढून विमा दावा फेटाळणे  या बाबी समोर येत होत्या. त्यामुळे राज्य सरकारनं या योजनेत सुधारणा करून त्यानुसार, आता राज्यात ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ जाहीर करण्यात आली आहे.

          योजनेच्या अंतर्गत अपघात ग्रस्त शेतकऱ्यास व त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरता राज्यातील सर्व व्यक्ती धारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील विधीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणत्याही एक सदस्य आई वडील किंवा त्याची पती-पत्नी मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतेही एक व्यक्ती असे एकूण दोन जणांचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. शेतकऱ्याला आता  दोन लाखापर्यंत थेट अनुदान देण्यात येते आधी या योजनेमध्ये शेतकऱ्याचा विमा काढला जात होता व तो शेतकऱ्याला विमा दिला जात होता परंतु आता हा विमा बंद करून थेट राज्य सरकारकडूनच शेतकऱ्याला अनुदान देण्यात येणार आहे.

 

अपघात व  मिळणारे आर्थिक सहाय्य :

 • अपघाती मृत्यू                                                                                                    – २,००,०००/- रुपये

 • अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पायकायम निकामी होणे     – २,००,०००/- रुपये

 • अपघातामुळे एक डोळा एक हात किंवा एक पाय कायम निकामी होणे              – २,००,०००/- रुपये

 • अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी होणे               – १,००,०००/- रुपय

   

योजनेसाठी पात्रता:

 • ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे, असे सर्वच शेतकरी या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार आहेत.

 • ज्यांच्या नावावर शेतजमीन नाही म्हणजे ज्यांचं सातबाऱ्यावर नाव नाही, पण ती व्यक्ती शेतकरी कुटुंबातील आहे, तर अशा कुटुंबातील कोणताही 1 सदस्य या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.

 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा १० ते ७५ या वयोगटातील असावा.

लाभासाठी पात्र अपघात:

शेतकऱ्याचा अपघात पुढील कारणांमुळे झाला असल्यास या योजनेअंतर्गत त्याच्या कुटुंबाला अर्ज करता येणार आहे.

 • रस्ता किंवा रेल्वे अपघात होणे

 • पाण्यात बुडून मृत्यू होणे

 • कीटकनाशक हाताळताना किंवा इतर कारणामुळे विषबाधा

 • विजेचा झटका बसल्यामुळे झालेला अपघात

 • वीज पडून आकस्मित मृत्यू

 • खून होणे

 • उंचावरून पडून झालेला अपघात

 • सर्पदंश व विंचूदंश यामुळे मृत्यू

 • नक्षलवादी हल्यात झालेल्या हत्या

 • जनावरांच्या हल्यामुळे /चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू

 • बाळंतपणातील मृत्यू

 • दंगल मध्ये मृत्यू

   

लाभासाठी अपात्र अपघात:

खालील अपघातात मृत्यू झाल्यास किंवा अंपगत्व आल्यास ते या योजनेसाठी ग्राह्य धरलं जाणार नाही.

 • नैसर्गिक मृत्यू झाल्यास

 • योजना सुरू होण्यापूर्वीचे अपंगत्व येणे

 • आत्महत्याचा प्रयत्न किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करुन घेणे

 • गुन्ह्याच्या उद्देशानं कायद्याचं उल्लंघन करून झालेला अपघात

 • मद्य व नशेली पदार्थांच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात

 • भ्रमिष्टपणा

 • शरीरांतर्गत रक्तस्राव

 • मोटार शर्यतीतील अपघात

 • युद्ध

 • सैन्यातील नोकरी

 

अर्ज कुठे व कसा करायचा :

 • शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यापासून तीस दिवसाच्या आत संबंधित प्रस्ताव मयताच्या कुटुंबानं तालुका कृषी अधिकाऱ्याकडे जमा करायचा आहे.

 • अपघात अहवाल व अपघाताविषयीची सविस्तर माहिती लिहून अर्ज करायचा आहे. यात स्वत: बद्दलची माहिती लिहून मग मयताचं नाव, त्यांच्यासोबतचं नाव, मृत व्यक्तीच्या मृत्यूचं कारण व दिनांक लिहायची आहे.

 • अपघातामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे की अपंगत्व आलं आहे, हे स्पष्ट लिहायचं आहे.

 • पुढे ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान” योजना लाभ मिळावा, बाबत अर्जात नोंद असावी

 • ही प्राथमिक माहिती प्राप्त झाल्या नंतर महसूल, पोलिस आणि कृषी अधिकाऱ्यांचं पथक प्रत्यक्षात घटनास्थळी भेट देवून चौकशी करून आठ दिवसांच्या आत आपला अहवाल तहसीलदारांना देतील.

 • तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समिती ३० दिवसांच्या आत शेतकरी कुटुंबाला मदत देण्याबाबत निर्णय घेईल.

 

अर्जासोबत जोडायची कागदपत्रे :

 • या योजनेसाठीच्या अर्जासोबत मृत्यूचं कारण स्पष्ट करणारा सरकारी कागद जसं की FIR,पंचनामा, मेडिकल रिपोर्ट, पोस्टमॉर्टम रिपोर्ट जोडणं अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय, पुढील कागदपत्रं जोडावी.

 • सातबारा उतारा

 • मृत्यूचा दाखला

 • शेतकऱ्याचे वारस म्हणून तालाठ्याकडील गाव नमुना नंबर ६ क नुसार वारसाची नोंद

 • शेतकऱ्याच्या वयाची खात्री होईल यासाठी त्याचे आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र

 • मृत्यूचा प्रथम माहिती अहवाल (FIR) किंवा स्थळ पंचनामा किंवा पोलीस पाटलाचा अहवाल

 • वारसदाराचे आधार कार्ड आणि बँक पासबूक.

वरील योजनांची माहिती व आशाच नवनवीन सर्व योजना शेतकरी बांधवांपर्यंत पोहचविण्यासाठी पोस्ट शेयर करा व  किसान योजना   kisaanyojna.com संकेतस्थळाला एकवेळ भेट द्या.

WhatsApp
Facebook
Telegram

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *