महाडीबीटी ट्रॅक्टर अनुदान| MAHADBT TRACTOR YOJNA

महाडीबीटी ट्रॅक्टर अनुदान| MAHADBT TRACTOR YOJNA

 

आधुनिक शेती मशागतीचा खर्च वाढल्याने राज्यातील शेतकऱ्यांकडून आता शासनाच्या अनुदानातील ट्रॅक्टरची मागणी वाढली आहे. राज्यातील तब्बल १५ लाख २९ हजार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अनुदानातील ट्रॅक्टरसाठी अर्ज केले आहेत.पण, शासनाकडे तेवढा निधी उपलब्ध नसल्याने २०२३-२४ मध्ये राज्यातील फक्त २५ हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मिळणार आहे.

बैलांची जोडी आता काळाच्या ओघात हळू हळू संपत चालली आहे. गावातील बहुतेक शेतकऱ्यांकडे असलेली बैलजोडी आता काही मोजक्याच शेतकऱ्यांकडे पहायला मिळते. शेतकऱ्यांचा कल आता ट्रॅक्टरकडे वाढला आहे. या पार्श्वभूमीवर २०२२-२३ मध्ये राज्य सरकारने राज्यातील १५ हजार शेतकऱ्यांना अनुदानातून ट्रॅक्टर दिले आहेत. शासनाच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना सव्वा लाखांची तर मागासवर्गीय, दिव्यांग, महिला, अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सव्वा ते दिड लाख रुपयांची सबसिडी दिली जाते. उर्वरित पैसे हप्त्याने संबंधित ट्रॅक्टर फायनान्स कंपनीला शेतकऱ्याला स्वतः भरावे लागतात.

भाड्याच्या ट्रॅक्टरला नांगरणीसाठी एकरी बावीसशे रुपये, तर कोळपणी, फणासाठी दीड हजार रुपये मोजावे लागतात. स्वत:चाच ट्रॅक्टर असल्यास तेवढा खर्च होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल ट्रॅक्टर खरेदीकडे वाढला आहे. त्यांची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून सुरु आहे.

अर्ज कुठे करायचं ?

शेतकरी बांधवांसाठी शासनाने विकसित केलेल्या MAHADBT या संकेस्थळावर जाऊन कृषी यांत्रिकीकरण टॅब मध्ये शेतकरी स्वतः अर्ज करू शकतात किंवा जवळील आपले सरकार CSC केंद्र, महा ई सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन केंद्र संचालक ची मदत घेऊ शकता.

कागदपत्र काय लागतील?

ट्रॅक्टर साठी अर्ज करायला फक्त.

१)आधार कार्ड झेरॉक्स.

२)पासबुक झेरॉक्स.

३)सातबारा, आठ- अ.

एकदा अर्ज केलेल्या अर्जावरच मिळेल योजनांचा लाभ

मागच्या वर्षी २५ हजार शेतकऱ्यांना अनुदानातील ट्रॅक्टर दिले असून यंदाही लाभ मिळेल. विशेष बाब म्हणजे एकदा महाडिबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी योजनांच्या लाभासाठी अर्ज केला की, त्याला लाभ मिळेपर्यंत पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही.

मित्रानो आशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आमच्या किसान योजना संकेत स्थळाला अवश्य भेट द्या व मित्रांना शेयर करायला विसरू नका.

WhatsApp
Facebook
Telegram

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *