तुम्हालाही आलाय का? आपतकालीन अलर्ट ? जाणून घ्या?

तुम्हालाही आलाय का? आपतकालीन अलर्ट ? जाणून घ्या?

नमस्कार शेतकरी बांधवानो…..           

      आज संपूर्ण भारतभर जवळ जवळ सर्वच मोबाईल वापरकर्त्यांना भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या वतीने एक अलर्ट संदेश जारी करण्यात आला. भारतीय जनतेच्या मोबाईलवर  अचानक एक अलार्म वाजण्यास सुरुवात झालीव मोबाइल व्हायब्रेट झाला. हा संदेश भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून आपतकालीन अलर्ट सेवेचे चाचणी घेण्याचा असल्याचं सांगण्यात आलं.

काय घडल?

आज २० जुलै २०२३ रोजी सकाळी १०:२०  ते १०: ३१  सुमारास अनेक मोबाईलधारकांचा मोबाईल अचानक मोठ्या आवाजात वाजायला लागला व व्हायब्रेट करायला लागला . व मोबाईलच्या स्क्रिनवर एक संदेश आला. त्यात हा संदेश भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या आपतकालीन संदेश सेवेचा भाग असल्याचं सांगण्यात आलं. काही सेकंद मोठ्या आवाजात अलार्म वाजल्यानंतर तोच मेसेज व्हॉईस रीड स्वरुपात ऐकू आला व आपतकालीन संदेश येण्यास परवानगी देखील मागितली होती. जशी आपतकालीन संदेशातील ओके बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला असे आपतकालीन अलर्ट हवे आहेत का असं विचारण्यात आलं. तसेच हो आणि नाही असे दोन पर्याय देण्यात आले. आधी हा अलर्ट इंग्रजीत आला ५ मिनीटांच्या फरकाने हाच संदेश परत मराठीत आला.

हा संदेश आपत्कालीन संदेश देण्यासाठी भारत सरकार दूरसंचार विभागातर्फे चाचणी स्वरुपात देण्यात आला असून घाबरून जाण्यासारखे यात काहीच नाही. हा संदेश पूर्णपणे सुरक्षित आहे.

माहिती आवडल्यास आपल्या बांधवाना शेयर करा व अशाच माहितीसाठी किसान योजना संकेतस्थळाला अवश्य भेट द्या

Facebook
WhatsApp
Telegram

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *