नमो शेतकरी महासन्मान निधी योजना | Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojna |CM Kisan

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना | Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojna |CM Kisan

नमो शेतकरी  महासंमान निधी योजना | Namo Shetkari Sanman Nidhi Yojna |CM Kisan

                सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्प मध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्याच्या  उत्पन्नवाढ होण्याच्या हेतूने “प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी” योजनेत राज्य शासनाचे अनुदान देण्याची भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ” राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

योजनेकरीता लाभार्थी पात्रता व देय लाभासाठीचे निकष:

नमो शेतकरी महासन्मान योजनेकरीता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाण म्हणून गृहित धरण्यात याव्यात.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत PMKISAN संकेतस्थळावर नोंदणी केलेले आणि केंद्र शासनाच्या निकषानुसार PMKISAN निधीसाठी पात्र ठरलेले सर्व लाभार्थी “नमो शेतकरी महासन्मान निधी” योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील.

केंद्र शासनाने लाभार्थी पात्रतेबाबत वेळोवेळी निकषांमध्ये केलेले बदल तात्काळ परिणामाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना देखील लागू होतील.

PM Kisan Portal प्रधानमंत्री किसान सन्मान संकेतस्थळावर नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळालेले पात्र लाभार्थी देखील या योजनेचे लाभार्थी राहतील.

योजनेची कार्यपद्धती:-

पी. एम. किसान योजनेच्या पीएफएमएस प्रणालीनुसार प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभास पात्र ठरलेले लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील.

लाभार्थ्यांना राज्य शासनामार्फत विकसित करण्यात येणा-या संकेतस्थळावरून / प्रणालीवरुन बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजेच DBT आधार संलग्न खात्यात निधी जमा केला जाईल.

 

निधी वितरण :

केंद्र शासनाच्या पी.एम. किसान निधी योजनेनुसार पुढील वेळापत्रक प्रमाणे नमो शेतकरी सन्मान निधीचे लाभ वितरण करण्यात येईल.

१) पहिला हप्ता               एप्रिल ते जुलै                   २००० रु

२) दुसरा हप्ता                ऑगस्ट ते नोव्हेंबर            २००० रु

3) तिसरा हप्ता                डिसेंबर ते मार्च                २००० रु

अशा प्रकारे “नमो शेतकरी महासन्मान निधी” CM Kisan Nidhi चे वितरण होईल असे जाहीर करण्यात आले आहे

नमो शेतकरी महासन्मान निधी” योजना संकेतस्थळ | Namo Shetkari Mahasanman Nidhi Portal

पी. एम. किसान सन्मान निधी योजनेतील पात्र लाभार्थीनाच म्हणजे ज्या शेतकरी बांधवाना PM Kisan योजनेचा लाभ मिळत आहे त्याच शेतकर्यांना “नमो शेतकरी महासन्मान निधी” योजनेअंतर्गत राज्याच्या निधीमधून लाभ देण्यात येणार असल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा जाहीर केली आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी लाभार्थी | Namo Shetkari Mahasanman Nidhi Beneficiary:

या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे, अशाच शेतकऱ्यांना “नमो शेतकरी महासन्मान निधी” योजनेचा लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आलेली आहे.

नव्या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात जवळपास १.१५ कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारने ज्यांच्याकडे शेती आहे व ज्यांचे उदरनिर्वाहाचे साधन शेती आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना यामध्ये समाविष्ट केले आहे. राज्य शासनाला या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ६ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात  करावी लागणार आहे.

शासनाच्या या नवीन नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमुळे शेतकऱ्यांना दुप्पट फायदा होणार आहे. कारण यापूर्वी शेतकऱ्यांना फक्त पीएम किसान सन्मान निधी योजनेतु वार्षिक  सहा हजार रुपये दिले जात होते. परंतु आता या cm kisan निधी या नवीन योजना अंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये असे वार्षिक १२ हजार रुपयांचा शेतकऱ्यांना लाभ दिल्या जाणार आहे.

अधिक माहितीसाठी GR पहा Namo Shetkari Mahasanman Nidhi GR नमो शेतकरी महासंमान निधी योजना जी आर 

वरील माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेयर करा व आशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आमच्या किसान योजना संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.

WhatsApp
Facebook
Telegram

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *