प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत झाले आहे महत्वाचे बदल

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत झाले आहे महत्वाचे बदल

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत झाले आहे महत्वाचे बदल

 

PM- किसान लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. PM किसान योजनेत काही महत्वाचे बदल केले हे नवीन बदल काय आहे हे आपण पुढीप्रमाणे जाणून घेऊ.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत १३ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. दरम्यान शेतकऱ्यांना सध्या १४ व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. या महिन्याच्या कोणत्याही तारखेला किसान सन्मान योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

पात्र शेतकऱ्यांची यादी तपासण्याचे काम कृषी विभागाकडून सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. म्हणून या योजनेचा निधी देण्यास विलंब होत असल्याची सूचना देण्यात आल्या आहेत.

PM किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला ६ हजार रुपये जमा केले जातात. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात दर ४ महिन्यांच्या अंतराने ३ हप्त्यांमध्ये वर्ग केली जाते. प्रत्येक हप्त्यात २ हजार रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.

तुम्ही आतपर्यंत ई-केवायसी केली नसेल, तरीही तुम्हाला अजुन संधी आहे. PM Kisaan पोर्टलला भेट देऊन तुम्ही ई-केवायसी करू शकता. किंवा जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.

राज्य सरकारकडूनही राज्यातील लाखो शेतकऱ्यांना किसान महासन्मान निधी अंतर्गत ६ हजार देण्यात येणार आहेत. राज्य आणि केंद्र सरकार यांचे मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तब्बल १२ हजार रुपये देण्यात येणार आहेत.

शासनाने PM Kisaan योजनेत काही बदल केले आहेत. लाभार्थी असल्याचे पाहण्यासाठीची पद्धतीत सरकारकडून बदल करण्यात आला आहे. पूर्वी शेतकरी मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांकाच्या मदतीने त्याच्या हप्त्याची माहिती घेत होते. परंतु आता पीएम किसान योजनेसाठी अर्ज करताना शेतकऱ्यांकडे नोंदणी क्रमांक असणे आवश्यक आहे. याशिवाय तुम्हाला कोणतेही अपडेट दिसणार नाही.

नोंदणी क्रमांक कसा मिळवायचा:

तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक रजिस्टेशन करताना दिला जातो आणि जर तो आठवत नसेल, तर पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर जाऊन. Know Your Registration Number वर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर कॅप्चा कोड टाकावा लागेल. यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर नोंदणी क्रमांक दिसेल.

PM Kisaan योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्येसाठी शेतकरी pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांक- १५५२६१ किंवा १८००११५५२६ या (टोल फ्री) किंवा ०११-२३३८१०९२ यावर संपर्क साधू शकता.

source : agrowon

Facebook
WhatsApp
Telegram

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *