प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना|Pradhan Mantri Ayushyman Bharat Yojna

प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना|Pradhan Mantri Ayushyman Bharat Yojna

प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना|Pradhan Mantri Ayushyman Bharat Yojna

 

नमस्कार माझ्या शेतकरी बांधवानो आपल्या सर्वांना माहिती आहे कि आजच्या धकाधकीच्या आणि दैनिक जीवनात आरोग्य किती महत्वाचे आहे कारण आजारपण हे खूप दुखमय असते आणि खर्चिक व त्रासदायक असते या काळात आपण जमा केलेली पुंजी पणाला लावावी लागते त्यावर एक उपाय म्हणून आरोग्य विमा हा पर्याय आहे. परंतु आरोग्यविमा काढणे प्रत्येक व्यक्तीला शक्य नाही करण त्याचा खर्च साधारण व्यक्तीला परवडत नाही म्हणून आपल्या देशाची बरीच लोकसंख्या त्यापासून वंचित राहते.परंतु आरोग्यविमा तर महत्वाचा आहेच म्हणून भारत  सरकार आपल्यासाठी आयुष्यमान भारत हि योजना घेऊन आले आहे.

 

योजनेचे नाव आयुष्मान भारत योजना किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
सुरुवात23.09.2018 (संपूर्ण भारतभर)
लाभ5 लाख रुपये पर्यंत मोफत इलाज
लाभार्थीभारतीय देशवासी
हेल्पलाइन नंबर14555
ऑफिसियल वेबसाइटhttps://pmjay.gov.in

प्रधानमंत्री आयुष्मान भारत (Pradhan Mantri Ayushman Bharat Yojana)

या योजनेद्वारे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जाणार आहे. या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना निवडक रुग्णालयांद्वारे 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य उपचार दिले जाणार आहेत.

भारतातील सर्व नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी ही योजना प्रभावी ठरेल. ही योजना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 सप्टेंबर 2018 रोजी सुरू केली होती. देशातील 40 कोटींहून अधिक नागरिकांना या योजनेत समाविष्ट करण्याचे सरकारचे लक्ष्य असून तशी तयारी सुद्धा जलद गतीने चालू आहे.

आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी अर्ज करू शकतात. ही योजना कार्यान्वित झाल्याने देशातील एकही नागरिक आर्थिक अडचणींमुळे उपचारापासून वंचित राहणार नाही. याशिवाय या योजनेच्या अंमलबजावणीमुळे देशातील नागरिकांचे जीवनमानही सुधारेल व रोगराई मुळे मृतांचे प्रमाण देखील घट होईल.

आयुष्मान भारत योजनेचे उद्दिष्ट

भारतातील दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांमध्ये, एखाद्या व्यक्तीस दुर्धर किंवा गंभीर आजार झाल्यास त्या कुटुंबातील आर्थिक अडचणींमुळे, हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे शक्य होईल.

आरोग्यावर होणारा सामान्य माणसाचा खर्च वाचून बचत करता येईल व नागरिकांना उत्कृष्ठ दर्जाची आरोग्यसेवा मिळून त्यांना आरोग्य लाभेल

सामान्य जनतेची हीच समस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजना सुरु केली आहे.

आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरीब कुटुंबांना आरोग्य विमा प्रदान करून आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचा सरकारचा उद्देश आहे.

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपलब्ध सुविधा

 • · वैद्यकीय तपासणी आणि उपचार
 • ·  रुग्णालयात दाखल होणे
 • औषधे आणि वैद्यकीय उपभोग्य वस्तू
 • ·रुग्ण देखभाल सेवा
 • · क्लिनिकल आणि प्रयोगशाळा चाचण्या
 • वैद्यकीय मलमपट्टी सेवा
 • आवास लाभ
 • अन्न सेवा
 • उपचारादरम्यान उद्भवलेल्या कॉम्प्लिकेशन्स चे उपचार
 • रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 15 दिवसांपर्यंत फॉलो अप
 • विद्यमान रोगावर उपचार
 • आयुष्मान भारत योजनेअंतर्गत येणारे काही आजार
 • कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग
 • प्रोस्टेट कैंसर
 • करॉटिड एनजीओ प्लास्टि
 • Skull base सर्जरी
 • डबल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट
 • Pulmonary व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट
 • इंटिरियर स्पाइन फिक्सेशन
 • Laryngopharyngectomy
 • टिश्यू एक्सपेंडर

आयुष्मान भारत योजनेचे फायदे

 • या योजनेअंतर्गत 10 कोटींहून अधिक BPL परिवारांचा समावेश केला जाणार आहे.
 • योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जातो.
 • 2011 मध्ये जी कुटुंबे सूचीबद्ध आहेत त्यांचाही PMJAY योजनेत समावेश करण्यात आला आहे.
 • या योजनेंतर्गत औषधांचा व उपचाराचा खर्च शासन करणार असून 1350 आजारांवर उपचार केले जाणार आहेत.
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही.
 • आयुष्मान भारत योजनेला जन आरोग्य योजना म्हणूनही ओळखले जाते .
 • या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल लोकांना उपचार घेण्यासाठी पैशांची चिंता करावी लागणार नाही.

आयुष्यमान भारत योजना आवश्यक कागतपत्रे

 1. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड
 2. शिधापत्रिका
 3. मोबाईल नंबर
 4. पात्याचा पुरावा

आयुष्यमान भारत योजना नोंदणी कुठे करायची

 • सर्वप्रथम, पंतप्रधान आयुष्मान भारत योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी, तुम्हाला योजनेअंतर्गत स्थापन केलेल्या सेवा केंद्र (CSC) वर जावे लागेल आणि तुमच्या सर्व मूळ कागदपत्रांच्या छायाप्रती तेथे सबमिट कराव्या लागतील.
 • यानंतर सेवा केंद्र (CSC) चा एजंट तुम्ही सबमिट केलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करेल आणि योजनेअंतर्गत नोंदणी सुनिश्चित करेल आणि तुम्हाला नोंदणी प्रदान करेल.
 • त्यानंतर 1 ते 5 दिवसांनंतर तुम्हाला सेवा (CSC) केंद्राद्वारे आयुष्मान भारतचे गोल्डन कार्ड प्रदान केले जाईल. यानंतर तुमची नोंदणी यशस्वी होईल.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आयुष्मान कार्ड ई-केवायसी

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत प्रति वर्ष प्रती कुटुंब पाच लाख रुपया पर्यंतचे मोफत उपचार

महाराष्ट्र व देशातील इतर राज्यामध्ये योजनेशी संलग्नित सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात केले जातात.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या कडे आयुष्मान कार्ड असणे आवश्यक आहे व हे कार्ड आपल्याला घरपोच मिळण्यासाठी आगोदर आपणास आयुष्मान कार्ड-ई केवायसी करून घेणे गरजेचे आहे.

आपण या योजनेचे लाभार्थी आहोत की नाही हे जाणून घेण्यासाठी https://beneficiary.nha.gov.in/ या वेबलिंकवर जाऊन बघू शकता.

बेनिफिशिअरी लॉगिन चा वापर करून तुम्ही स्वतःचे कार्ड स्वतः बनवू शकता

Google Play स्टोर मधून Ayushyaman App डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा —

Ayushman App National Health Authority

आयुष्मान अँप (Ayushman app) डाउनलोड व लॉगईन करण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी खालील वेबलिंकवर क्लिक करून आपण माहिती मिळवू शकता

https://www.youtube.com/watch?v=RhiNP1Uw_DM&list=PLYcj0BpCoCc7CBFxCMJo2Ms2iKypz5kAw&index=3

आयुष्मान कार्ड ई केवायसी प्रक्रिया आणि आयुष्मान कार्ड डाउनलोड प्रक्रिया जाणण्यासाठी खालील वेबलिंक वेबलिंकवर क्लिक करून आपण माहिती मिळवू शकता :

https://www.youtube.com/watch?v=3MrCt360JS0&list=PLYcj0BpCoCc7CBFxCMJo2Ms2iKypz5kAw&index=4

आपले नाव यादीत असल्यास राशन कार्ड, आधार कार्ड व आधार संलग्नित मोबाईल क्रमांकसह आपण आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत मधील आपले सरकार केंद्र चालक, आपल्या जवळील कॉमन सर्विस सेन्टर(CSC) (महा ई-सेवा केंद्र), स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे जाऊन आपले आयुष्मान कार्ड – ई-केवायसी मोफत करून घेऊ शकता. यासाठी कोणतेही शुल्क आपणास अदा करण्याची गरज नाही.

आयुष्यमान भारत योजना मदत हेल्पलाइन

 • Toll-Free Call Center Number- 14555/1800111565
 • Address: – 3rd, 7th & 9th Floor, Tower-l, Jeevan Bharati Building, Connaught Place, New Delhi – 110001

आपले कार्ड बनविण्यासाठी जवळच्या आपले सरकार केंद्रास भेट द्या. व हि माहिती आपल्या गरजवंत मित्रांना नक्की शेयर करा

अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसती आमचे किसान योजना संकेतस्थळाला अवश्य भेट द्या

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *