फक्त १ रुपयात काढा पीक विमा योजना: 1 Rupayat Pik Vima – किसान योजना

फक्त १ रुपयात काढा पीक विमा योजना: 1 Rupayat Pik Vima – किसान योजना

नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार,

 

         राज्यातील शेतकर्‍यांनी मागील खरीप हंगाममध्ये जवळ-जवळ एकूण ६५४ कोटी रुपये भरले. शेतकर्‍याच्या हिस्याची रक्कम जाहीर करून, शेती पिकांचे कंपनी मार्फत पंचनामे करून पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी आपल्याला भरपूर प्रमाणात बघण्यास मिळतात व शासनाकडेही अशा तक्रारी पोहचल्या आहे. या सर्व बाबींचा विचार करून शिंदे-फडणवीस सरकार या पीक विम्याच्या धोरणात बदल करून शेतकरी हिताचा नवीन अर्थसंकल्प हा सादर केला आहे.

 

          शेतकर्‍यांनी एवढी रक्कम भरूनही काही फायदा होत नसल्याने शेतकरी बांधवांमध्ये पीक विमा योजना बदल खूप संताप निर्माण झाल्याचे दिसून येते. हि गोष्ट यापुढे होऊ नये याच करिता शिंदे-फडणवीस सरकारने “एक रुपयांत पीक विमा योजना” अशी नवीन योजना आणली आहे.

 

या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी फक्त १ रुपये भरून “प्रधानमंत्री पिक विमा योजनेत” (PMFBY) भाग घेता येणार आहे .ही योजना राज्यातील शेतकर्‍याच्या हिताची व अत्यंत महत्वाची घोषणा मानली जात आहे. सन २०१६ पासून पीक विमा योजनेत सहभागी लाभार्थी नोंदणी करण्यासाठी शेतकर्‍यांना विम्याची २ टक्के रक्कम भरावी लागत होती. परंतु यापुढे शेतकऱ्यांच्या पिकविम्याचा संपूर्ण खर्च हा राज्य सरकार उचलणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीवर ३३१२ कोटी रूपयांचा भार पडणार आहे.

 

माहिती आवडल्यास इतरान नक्की पाठवा व आशाच नव-नवीन योजनांच्या माहितीसाठी किसान योजना  या संकेतस्थळाला एकदा अवश्य भेट द्या. https://kisaanyojna.com.

 
WhatsApp
Facebook
Telegram

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *