मॉन्सूनचे आगमन

मॉन्सूनचे आगमन

नमस्कार शेतकरी मित्रानो..

नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे म्हणजेच (मॉन्सून) तब्बल सात दिवस उशिराने का होईना, पण केरळ मध्ये प्रवेश झाला आहे. मॉन्सूनने दक्षिण तामिळनाडू आणि केरळचा बराचसा भाग 8 जून गुरुवारी व्यापला आहे. अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने 8 जून गुरुवारला जाहीर केली आहे.

केरळ राज्यात मॉन्सूनचे आगमन झाले असून देशात मॉन्सूनचा प्रवेश सुरू आहे. सध्या मॉन्सून केरळचा जवळ जवळ पूर्ण भाग, दक्षिण तामिळनाडू, दक्षिण अरबी समुद्राचा उर्वरित भाग, लक्षद्वीप बेटे, ईशान्य आणि मध्य बंगालच्या उपसागराचा भागात पोहचला आहे. दरम्यान पुढील 48 ते 72 तासात संपूर्ण केरळसह तामिळनाडू, कर्नाटक, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आणखीन काही भागात मॉन्सून सक्रिय बनेल. असे हवामानशास्त्र विभागाने नमूद केले आहे. साधारणपणे मॉन्सून १ जूनपर्यंत (दीर्घकालीन आगमनाच्या वेळेनुसार) केरळमध्ये दाखल होतो. तर गेल्या १६ मे रोजी हवामानशास्त्र विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार मॉन्सून ४ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होणार होते व त्यात चार पाच  दिवसांची तफावत होऊ शकते, असे ही नमूद करण्यात आले होते. मात्र त्यास विलंब झाला असून प्रत्यक्षात 8 जूनला  गुरुवारी केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन झाले.त्यामुळे यंदा मॉन्सूनने ७ दिवस उशिराने देशाच्या भूभागात केरळमध्ये प्रगती केली.

– मॉन्सूनच्या वाटचालीसाठी पुढील पोषक वातावरण

पुढील दोन दिवसात संपूर्ण केरळ व्यापण्याची शक्यता

मध्य अरबी समुद्र, तामिळनाडूचा आणखी काही भाग, कर्नाटक आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागात तसेच ईशान्येकडील राज्यात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने सांगितले आहे.

 

WhatsApp
Facebook
Telegram

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *