वारकरी माउलीसाठी "विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना" Vitthal Rakhumai Vima Chhatr Yojna

वारकरी माउलीसाठी “विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना” Vitthal Rakhumai Vima Chhatr Yojna

जय हरी माऊली..

        महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री. विठ्ठलाच्या पंढरपूरसाठी दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त वारी निघते सर्व वारकरी वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या ठिकाणाहून या वारीमध्ये सहभागी होत असतात वारीसाठी येणाऱ्या वारकरी माऊली साठी राज्य शासनाने
“विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना” VitthalRakhumai Varkari Vima Chhatra Yojna  सुरु केली आहे.

“विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना”  मुख्य हेतू काय आहे

काही वर्षात आपण बघत आहोत कि,  वारीच्या कालावधी दरम्यान जे काय अपघात तसेच दुर्घटना वारकरी माउली सोबत घडून  येत असतात ज्यात वारकरी बांधव गंभीर जखमी होतात त्यांना अपंगत्व विकलांगता येते किंवा काही वेळा त्यांचा ह्या दुर्घटनेत मृत्यू देखील होतो अशा वारकरी माऊलींसाठी त्यांच्या परिवारास आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी शासनाने ही “विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना” सुरू केली आहे

विमा स्वरूप:

“विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र  योजना”  Vitthal Rakhumai Vima Chhatr Yojna आषाढी वारी 2023 करिता श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी अथवा खाजगी/ सार्वजनिक
वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्यांरीता लागू राहील.

या योजनेचा विमा कालावधी या शासन शाषण निर्णय निर्गमित दिनांकापासून 30 दिवसाचा राहील.

या योजनेंतगंत विमा कंपनीकडे दावा करण्यासाठी संबंधीतांनी विहित नमुन्यातील अर्कज करणे आवश्यक राहील.

तसेच संबंवधत वारकरी आषाढी वारी 2023 करता श्री. क्षेत्र पंढरपूर येथे गेल्याबाबतचे, वारकरी राज्यातील ज्या गावाचा / शहराचा सर्वसाधरण रहीवासी आहे त्या गावाच्या / शहराच्या संबंधीत तहसीलदार यांचे प्रमाणपत्र दाव्याच्या अर्जोजासोबत जोडणे आवश्यक राहील.

या योजनेंतर्गत एखाद्या दुर्घटनेत /अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास या वारकऱ्याच्या वारसास
रु.1.00 लक्ष इतकी रक्कम विमा कंपनी कडून देण्यात येणार आहे. तसेच दिंडीच्या दरम्यान अपघातात कायमचे अपंगत्व वा विकलांगता  आल्यास विमा कंपनीकडून खालीलप्रमाणे प्रतीव्यक्ती विमा रक्कम प्रदान करण्यात येणार आहे:-
(अ) दोन्ही हात, दोन्ही पाय, दोन्ही डोळे, एक हात पाय व एक डोळा निकामी झाल्यास रु.१,००,०००/-
(ब) एक हात, एक पाय अथवा एक डोळा वनकामी झाल्यास रु.५०,०००/

या व्यतिरिक्त वैद्यकीय उपचारासाठी प्रत्येकी रु.३५,०००/-अथवा प्रत्यक्ष वैद्यकीय  खर्च यापैकी जी कमी
असेल तेवढी रक्कम विमा कंपनीकडून प्रदान करण्यात येणार आहे.

तसेच या योजनेंतगंत एखादया दुर्घटनेत /अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास रु.1.00 लक्ष विमा
रकमेव्यतिरिक्त या वारकऱ्याच्या वारसास रु.४ लक्ष इतकी रक्कम राज्य शासनाकडून देण्यात येईल.
यासाठी संबंधीत वारकरी यांच्या वारसाने जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक राहील.

विठ्ठल रखुमाई वारकरी छत्र योजनेसाठी लाभार्थी पात्रता : Vitthal Rakhumai Vima Chhatr Yojna

१) समूह विमा योजनांच्या प्रचलित नियमानुसार सदर योजना कार्यान्वित करण्यासाठी सदरील समूहाचे स्तरावर बंधन करण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा समिती स्थापन करण्यात येईल

२) सदरील योजने करिता संबंधित विमा कंपनीकडून नाव नसलेले विमा पत्रक निर्गमित करण्यात येणार असून त्याकरता वारकरी हा गट विनिर्देशित करण्यात येत आहे

३) ज्या दिवशी विमा हप्ता भरण्यात येईल त्याच्या पुढील तारखेपासून 30 दिवसापर्यंत त्याची मुदत राहील

४) एखादी व्यक्ती जर सदर कालावधीत मरण पावल्यास ती वेळ वारकरी समुदायातील आहे किंवा असे याची पडताळणी करण्याकरता सक्षम प्राधिक कार्याकडून जिल्हाधिकार्यालयाकडून तसे प्रमाणित करण्यात येईल

५) सदर विमा पत्रकामध्ये समाविष्ट वारकऱ्यांची संख्या समाविष्ट करण्यात येईल

विमा पत्रकात खालील प्रमाणे कारणांकरिता लाभ देय होणार नाही :

१) आत्महत्या केल्यास  अथवा तसा प्रयत्न केल्यास

२) अमली अथवा मादक पदार्थाच्या अंमल अंमलाखाली मृत्यू झाल्यासप्रसूती अथवा बाळंतपणा दरम्यान मृत्यू किंवा विकलांगता आल्यास

३) गुन्हेगारी उद्देशाने कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे आलेल्या मृत्यू किंवा विकलांगता आल्यास

४) गुप्तरोग अथवा वेडसरपणा यामुळे आलेल्या मृत्यू किंवा विकलांगता आल्यास

५) किरणोत्सारी अनुभट्ट्या युद्ध व बंड इत्यादी तत्सम कारणामुळे उद्भवलेल्या मृत्यू किंवा विकलांगता आल्यास

सबंधित GR Vitthal Rakhumai Vima Chhatr Yojna

वरील माहिती आवडल्यास आपल्या वारकरी बांधवांना शेयर करा. अशाच माहिती साठी आमच्या किसान योजना या संकेत्स्थाला नक्की भेट द्या

Facebook
WhatsApp
Telegram

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *