नमस्कार शेतकरी मित्रांनो

आपल्यासाठी अगदी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना बी बियाणे खते औषधे इत्यादी खरेदी

करण्यासाठी शासनाकडून “राष्ट्रीय अन्न  सुरक्षा योजना”  अंतर्गत  अनुदान देण्यात येत आहे.

शासनाने सुरू केलेल्या महाडीबीटी या संकेतस्थळावर विविध योजना राबवण्यात येत असतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही.

आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजना अंतर्गत बी-बियाणे सुद्धा दिली जातात.

आवश्यक लागणारे कागदपत्रे

  • आधार कार्ड झेरॉक्स
  • बँक खाते पासबुक झेरॉक्स
  • सातबारा उतारा

इत्यादी कागदपत्र असणे आवश्यक आहे.

“राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान” योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२३ साठी बी- बियाणांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले असून इच्छुक शेतकरी यांनी मुग,उडीद, तूर,भात, मका, सोयाबीन इत्यादी बियाण्यांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी शासनाने महाडीबीटी पोर्टल वरती शेतकरी योजना या पर्यायांमध्ये बियाणे हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे तेथून शेतकऱ्यांना बियाण्यासाठी स्वतः ऑनलाईन अर्ज करू शकतात किंवा जवळच्या CSC केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, महा-ई-सेवा केंद्र येथे जाऊन त्यांच्या मदतीने शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

मित्रानो आशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आमच्या किसान योजना संकेत स्थळाला अवश्य भेट द्या व मित्रांना शेयर करायला विसरू नका.

WhatsApp
Facebook
Telegram