स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना | Balasaheb Thackeray Apghat Vima Yojna

स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना | Balasaheb Thackeray Apghat Vima Yojna

रस्ते अपघात झाल्यास कोणत्याहि दवाखान्यात ७२ तासासाठी मोफत इलाजास शासनाकडून GR मंजुर.

 

नमस्कार मित्रांनो..
              आपण आपल्या धावपळीच्या जीवनात आपण रोज कुठे ना कुठे अपघात झाल्याचे ऐकतो किंवा पाहतो त्या अपघातग्रस्त रुग्णाांना वेळीच गोल्डन आवर मध्ये उपचार मिळावा व रुग्णाांना जवळच्या रुग्णालयात स्थलाांतर केले तर मृत्यूचे व अपंगत्वाचे प्रमाण कमी होईल. तसेच अपघातग्रस्त रुग्णास रक्तस्त्राव होत असेल व अशा रुग्णास वेळेवर स्थलाांतर केल्यामुळे किंवा मेंदुला इजा झालेल्या रुग्णाांना वेळेवर ऑस्क्सजन देऊन व योग्य पधतीतीने रुग्णालयात दाखल केल्यास अशा रुग्णाचा मृत्यू व मेंदूची इजा कमी होण्यास मदत होईल. व रुग्णाचे प्राण वाचतील या उद्देशान राज्य शासनाने स्व.बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेस मान्यता दिली आहे.

योजनेचे उद्दिष्ट :-
अपघाता नंतर पहिल्या 72 तासात रस्ते अपघात झालेल्या व्यक्तीस तत्पर
वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे.

योजनेचे पात्र लाभार्थी :-
महाराष्ट्राच्या भौगोलीक सीमेतील कोणत्याही रस्त्याांवर अपघातामध्ये
गंभीररीत्या जखमी झालेल्या व वैद्यकीय उपचाराची तात्काळ आवश्यकता असलेल्या व्यक्ती
(अधिवास अटीशिवाय ) या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील.

योजना अपात्र :-
औद्योगीक अपघात, दैनंदिन कामातील किंवा घरी घडलेले अपघात व रेल्वे अपघाताने जखमी होणाऱ्या व्यक्तींना या
योजनेचा लाभ मिळणार नाही.

योजनेअंतर्गत देण्यात येणारे लाभ:-
              रस्ते अपघातातील जखमी झालेल्या रुग्णाांची परिस्थिती स्थिर करण्यासाठी लागणाऱ्या वैद्यकीय सेवा पहिल्या ७२ तासासाठी नजीकच्या अंगीकृत रुग्णालयामधून ७४ उपचार पद्धतीचा (परिशिष्ट-अ) माध्यमातून देण्यात येतील. 

योजनेंअंतर्गत अपघातग्रस्त रुग्णास पूर्णपणे मोफत वैद्यकीय उपचाराचा लाभ देण्यात येईल. प्रती रुग्ण प्रती अपघात रुपये ३०,०००/- (रूपये तीस हजार) पर्यंतचा खर्च अंतिम केलेल्या package च्या दरानुसार या अंतर्गत अंगीकृत रुग्णालयास विमा कंनीकडून अदा करण्यात येईल. 

स्थलांतर करण्यात आलेल्या रुग्णालयात पुढील उपचाराच्या सेवा उपलब्ध नसल्यास अशा सेवा उपलब्ध असणाऱ्या जवळच्या रुग्णालयात १०८ रुग्णवाहिकेने, ती उपलब्ध नसल्यास पर्यायी रुग्णवाहिकेने रुग्ण स्थलाांतर केले जाईल. अशा परीस्स्थतीत package च्या दरा व्यातिरिक्त रुपये १००० रुपये पर्यंत रुग्ण वाहिकेचे भाडे कंपनी मार्फत अंगीकृत रुग्णालयास देण्यात येईल. 

रुग्णालय जर महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना/प्रधानमांत्री जन आरोग्य योजनेंआंतर्गत मान्यताप्राप्त असेल व रुग्ण सदर योजनेचा लाभार्थी असेल व होणारेउपचार योजनेपैकी असून त्याची पूर्व मंजुरी मिळाली असेल तर त्या उपचारासांबांधी या योजनेची रक्कम रुग्णालयास मिळणार नाही.

योजनेंअंतर्गत निशुल्क अनुज्ञेय सेवा:-
रुग्णालयात दाखल झाल्यापासून ७२ तासापर्यंत खालील विना शुल्क वैद्यकीय सेवा अनुज्ञेय राहतील.

1. जखमेतून होणारा रक्त प्रवाह थांबवणे, जखमेस टाके घालणे तसेच ड्रेसिंग करणेअसे प्राथमिक
उपचार करणे.
2. अती दक्षता विभाग व वार्डमधील उपचार.
3 अस्थिभंग, हेड इंजुरी, पाठीच्या मणक्याला झालेली दुखापत, जळाल्यामुळे झालेली दुखापत
यावरील उपचार.
4. अस्थिभंग रुग्णासाठी आकस्मिक परिस्थितीत लागणारे इम्प्लाांट्स् देणे
5. रुग्णास साधारण रक्तस्त्राव झाला असेल तर रक्त (Whole blood) देणे, अती रक्तस्त्राव झाला
असल्यास रक्त घटक पी.सी.व्ही. (Packed cell volume) देणे, अपघातामुळे जळालेला रुग्ण
आल्यास आवश्यक प्रमाणे रक्त घटक प्लाझ्मा (Plasma) देणे, अपघातामुळे अवतरक्तस्त्राव
झाल्यामुळे आवश्यक (Platelets) देणे.
6. तज्ञांनी सुचववलेल्या ७४ प्रोसिजर मधील विविध तपासण्या व औषधोपचार (परिशिष्ट-अ नुसार).
7. रुग्णाच्या रुग्णालयातील वास्तव्याच्या कालावधीत भोजन. 

शाषण निर्णय  

योजनेचा तपशील बघण्यासाठी शासन निर्णय पहा 

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या किसान योजना संकेतस्थळाला अवश्य भेट द्या व सदर माहिती मित्रांना शेयर नक्की करा 

WhatsApp
Facebook
Telegram
Print

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *