E Pik Pahani खरीप 2023 नोंदणीला सुरुवात, ई-पीक पाहणी पीकविमा व अनुदानासाठी अनिवार्य.

E Pik Pahani खरीप 2023 नोंदणीला सुरुवात, ई-पीक पाहणी पीकविमा व अनुदानासाठी अनिवार्य.

E-Pik Pahani | ई-पिक पाहणी

 

नमस्कार शेतकरी बांधवानो..

आज आपल्यासाठी खास नवीन ई-पिक पाहणी  बद्दल सर्व माहिती घेऊन आलो आहोत.

 

ई पीक पाहणी म्हणजे काय ?

ई -पीक पाहणी E-PIK PAHANI हा एक सर्वेक्षण ॲप असून याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांची नोंदणी तलाठी कार्यालयात न जाता स्वतः करता  येते.

शेतकऱ्यांना देय असलेल्या कोणत्याही योजनेचा थेट लाभ मिळवण्यासाठी ई-पीक पाहणी प्रकल्प शासनाकडून सुरू करण्यात आलेला आहे व सातबारा वरील पेरा व इतर माहितीच्या नोंदी जसे कि, शेतातील विहीर, बोअर वेल, शेतातील झाडे  व इतर नोंदी आपण या प्रणालीद्वारे करू शकता.

शेतकरी मित्रांनो, दरवर्षी प्रमाणेच यावर्षीसुद्धा ई-पीक पाहणीला “E- Peek Pahani” सुरुवात झालेली आहे. राज्यात थोड्याफार प्रमाणात पाऊस पडल्यामुळे खरीप 2023 च्या पेरण्या झालेल्या आहेत. 1 जुलै 2023 पासून शेतकरी खरीप २०२३ हंगाम  ई-पीक पाहणी नोंदणी करू शकतात. ई पीक पाहणी करण्यासाठी नवीन अँड्रॉइड एप्लीकेशन अपडेट करण्यात आलेलं आहे.

शेतकऱ्यांनाही आपल्या शेतात काय पेरणी केली याची नोंद करण्यासाठी आता कोणत्याही तलाठी कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आपल्या मोबाईलवर शेतकरी सहज व सोप्या पद्धतीने ई पीक पाहणी करून आपल्या पिकाची नोंद स्वतः करू शकतात. त्यासाठी गुगल प्ले स्टोर वर जाऊन E PIK PAHANI नावाचा अप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यावा.

ई- पीक पाहणी |E -PIK PAHANI App डाउनलोड कसा करायचा?

गुगल प्ले स्टोर वरून तुम्ही स्वतः ई पिक पाहणी डाउनलोड करू शकता अथवा   खालील  लिंकचा वापर करून तुम्ही ई पिक पाहणी  डाउनलोड करू शकता.

https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova

ई-पीक पाहणी अप्लिकेशन सुविधा

 • Geo Taging सुविधा
 • शेतकरी ई-पीक पाहणी स्वयंप्रमाणित मान्यता
 • किमान 10% तपासणी तलाठ्यांमार्फत
 • 48 तासात ई पीक पाहणी दुरुस्ती सुविधा
 • किमान आधारभूत किंमत नोंदणी सुविधा
 • मिश्र पिकांमध्ये इतर 3 मुख्य पीक नोंदविण्याची सुविधा
 • शेतातील पिकेरा नोंदणी करता येते
 • शेतातील नवे जुने झाडांची नोंदणी करता येते
 • विहीर अथवा बोरवेलची नोंद
 • संपूर्ण गावाची ई पीक पाहणी बघण्याची सुविधा
 • अप्लिकेशन अभिप्राय रेटिंगची सुविधा
 • खाता अपडेट करण्याची सुविधा

ई-पीक पाहणी कशी करायची  

खालील प्रमाणे स्टेप बाय स्टेप आपण ई पिक पाहणी करू शकता.

E Pik Pahani खरीप 2023 नोंदणीला सुरुवात, ई-पीक पाहणी पीकविमा व अनुदानासाठी अनिवार्य.


कधी पर्यंत करता येईल ई  पिक पाहणी ?

स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट 2021 मुहूर्तावर राज्यातील महसूल विभागामार्फत ई-पीक पाहणीची मोहीम सुरू करण्यात आली होती. हंगाम सुरु झाल्यानंतर त्या हंगामाच्या पिकाची नोंद करण्यासाठी शासनाने काही निर्धारित वेळ दिलेला असतो त्या वेळेत खरीप हंगाम २०२३ साठी व रब्बी हंगाम या दोन्ही हंगामामध्ये शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंद करण्यासाठी दरवर्षी ई-पीक पाहणी पूर्ण करावी लागते. राज्यामध्ये सध्यास्थितीला 1 कोटी 88 लाख शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी द्वारे त्यांची नोंदणी केलेली आहे.

गावची ई-पीक पाहणी यादी

शेतकरी बंधुनो, तुमच्या गावातील ई पीक पाहणीची यादी (List) पाहण्यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे ई पीक पाहणी अँप तुमच्या मोबाईल मध्ये  इन्स्टॉल असणं गरजेच आहे.

ई-पीक पाहणी ॲप उघडल्यानंतर तुमच्यासमोर बरेच पर्याय दिसतील. ई-पीक पाहणी लिस्ट पाहण्यासाठी तुम्हाला शेवटचा पर्याय “गावाचे खातेदारांची पीक पाहणी” या पर्यायावर क्लिक करायचा आहे.

त्यानंतर तुमच्यासमोर गावातील संपूर्ण शेतकऱ्यांची यादी दिसेल. व ज्या  शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केलेली असेल, त्यांचं नाव हिरव्या रंगात अधोरेखित केलेले असेल.

शेतकरी बांधवांना, आपल्या शेतातील पिकांची, फळ झाडांची, पडीक जमिनीची, विहीर अथवा बोरवेलची नोंद आपल्या मोबाईल वरती करता येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी ऑनलाईन पद्धतीने करावी लागणार आहे. ई पीक पाहणी ऑनलाईन नोंद करण्याची पद्धत एकदम सोपी आहे. सुशिक्षित शेतकरी फक्त काही मिनिटाच्या आत ई-पीक पाहणी मोबाईलवरून करू शकतात.

माहिती आवडल्अयास आपल्शाया शेतकरी मित्चरांना नक्की शेयर करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या किसान योजना संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.

Facebook
WhatsApp
Telegram

Similar Posts

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *