PM कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023 | PM Kusum Solar Pump Yojna Maharashtra Mahaurja

PM कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023 | PM Kusum Solar Pump Yojna Maharashtra Mahaurja

प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना |Pradhanmantri Kusum Solar Pump Yojna

                      महाऊर्जामार्फत संपूर्ण देशभरात “महाकृषि ऊर्जा अभियान” पीएम-कुसुम घटक-ब योजनेच्या पुढील टप्प्याअंतर्गत सौर कृषिपंपासाठी  शेतकऱ्यांना महाउर्जा ऑनलाईन संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी पोर्टल दि. १७ मे २०२३ रोजी पासून सुरु करण्यात येत आहे.

PM- Kusum योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी त्यांच्या क्षेत्रानुसार व  ३, ५ व ७.५ HP DC क्षमतेचे सौर कृषिपंप आस्थापित करण्यात करून देण्यात येतात.

केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार “महाकृषी ऊर्जा अभियान” अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना ‘Kusum Solar Yojna’ऑनलाइन नोंदणी घटक-ब योजना जाहीर करण्यात आली असून सोलर पंप Solar Pump घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर  करावेत, असे आवाहन महाऊर्जाच्यावतीने करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत  पुढील 5 वर्षात 5 लाख सौर कृषीपंप स्थापित करण्यात येणार आहे व त्यापैकी पहिल्या वर्षासाठी १ लाख सौर कृषीपंप स्थापित करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

PM कुसुम योजनेची वैशिष्टये |PM Kusum Solar Yojna

 • पारेषण विरहित ३८००० सौर कृषी पंपाची राज्यातील ३४ जिल्हयात स्थापना करून शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार.
 • शेतकऱ्यांच्या शेती क्षेत्र क्षमतेनुसार 3 HP, 5 HP, 7.5 HP व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती DC सौर पंप महाउर्जा सोलर पंप उपलब्ध होणार.
 • सर्व साधारण वर्गवारीच्या लाभार्थ्याचे कृषी पंप किंमतीच्या 10% तर अनुसुचित जाती अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना 5% लाभार्थी हिस्सा.
 • इतर वीज उपकरणे चालवण्यास पोर्ट उपलब्ध

PM कुसुम योजना लाभार्थी निवडीचे निकष 2023

 1. शेततळे, विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदीनाले याच्या शेजारील, तसेच शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी.
 2. पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी.
 3. अटल सौर कृषी पंप योजना टप्पा- 1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत अर्ज केलेले तथापि मंजुर न झालेले अर्जदार.
 4. २ हेक्टर पर्यंत जमीन धारकास ३ HP DC, २ हेक्टर वरील  शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 HP DC व त्यापेक्षा जास्त शेतजमीन धारकास 5 HP DC  क्षमतेचे सौर कृषी पंप अनुज्ञेय राहील.

PM कुसुम योजना कागदपत्रे  2023| PM Kusum Solar Yojna

 • आधारकार्ड प्रत –
 • शेतीचा ७/१२ उतारा (विहिर, कुपनलिका शेतात असल्यास 7/12 उताऱ्यावर नोंद आवश्यक)
 • बँक पासबुक प्रत अथवा रद्द केलेला धनादेश
 • पासपोर्ट आकाराचा छायाचित्र.
 • शेत जमीन / विहिर / पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र. (एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रू. 200/- च्या स्टँप पेपरवर सादर करावे

PM कुसुम योजना अनुदान व भरणा |PM Kusum Solar Yojna

कुसुम सोलर पंप योजनेला 90 ते 95 % आहे म्हणजेच तुम्हाला 5 ते 10% रक्कम पुढील प्रमाणे भरावी लागते.

3 HP सोलर पंप

 • खुला – 19,380/-
 • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – 9,690/-

5 HP सोलर पंप

 • खुला – 26,975/-
 • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – 13,488/-

7.5 HP सोलर पंप

 • खुला -37,440/-
 • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – 18,720/-

वरीलप्रकारे शेतकर्यांना कुसुम सोलर पंप योजनेचे नवीन दर जाहीर झाले.

 

कुसुम सोलर योजनेची नोंदणी कुठे व कशी करावी :PM Kusum Solar Yojna

PM कुसुम सोलर योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी शेतकरी स्वतः ऑनलाईन अर्ज करू शकतात किंवा जवळील CSC केंद्रावर जाऊन अर्ज करू शकतात  अर्ज करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B

सेफ लिस्ट मध्ये नाव नसेल तरी शेतकरी अर्ज करू शकता त्यासाठी डिझेल पंप वापरत आहे होय हा पर्याय निवडावा व  पुढील माहिती भरून

अर्ज पूर्ण करावा व १०० रु चलन भरून लोगिन करून पूर्ण माहिती भरून अर्ज सदर करावा

 

PM कुसुम सौर कृषी पंप योजना घोषणा |PM Kusum Solar Yojna

 • कुसुम सौर कृषिपंपाच्या योजना लाभ घेण्यासाठी विहिरीची किंवा कुठल्जयाही पक्या जल स्त्रोताची खोली अर्ज नमुना ए -१ मध्ये नमूद केल्यानुसारच असावी .
 • पाणी पातळी खोली आहे टी योग्य नुमूद करावी त्यानुसार PUMP stage ठरवण्यात येतो, खोली चुकीची टाकल्यास पंप stage चुकीचा येतो व पाणी कमी मिळते त्यास  महाऊर्जा कार्यालय | पुरवठाधारक जबाबदार राहणार नाही. याची मला जाणीव आहे.
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी मी सौर पंपाच्या किंमतीचा लाभार्थी हिस्सा १० टक्के (अनुसूचित जाती / जमातीच्या लाभार्थ्यांसाठी ५ टक्के भरण्तयाची तयारी असावी.
 • सोलर पंपाच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे याची मला जाणीव करुन दिलेली असून अशी किंमतीचा वाढीव हिस्स्याची रक्कम भरण्यास तयारी असावी.
 • सौरपंपाच्या दररोजच्या निगराणीचीआणि सुरक्षा करण्याची जबाबदार स्वतःची असावी. ज्या ठिकाणी सोलर पंपाची मागणी केली आहे तेथे कृषी पंपासाठी मला वीज जोडणी मिळाली नाही. मिळालेल्या सौर पंपाचे रक्षण करणे हि माझी जबाबदारी आहे ह्याची मला जाणीव आहे.
 • मी सौर पंप बसविण्याकरिता माझ्या शेतजमिनीत प्रवेश करण्यास परवानगी देण्यास बांधिल आहे.
 • तसेच सौर तपासणीसाठी मी अधिकारी, वेळोवेळी दुरुस्ती कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे सहकार्य करेन. त्यात अडथळा आणणार नाही किंवा अडथळा आणू देणार नाही.
 • ५ वर्षाच्या कालावधीत ज्या विंधन विहीर (बोअरवेल)/ विहीर शेततळे  वर व ज्या  गट क्रमांकामध्ये सोलर पंप  बसविला आहे , त्या ठिकाणी तो  कायमस्वरुपी ठेवणार असल्याची हमी देत आहे. त्याची एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलविण्यासाठी मला महाऊर्जा कडून लेखी परवानगी (नाहरकत प्रमाणपत्र) घेणे बंधनकारक राहिल

नियम व अटी |PM Kusum Solar Yojna

 • कोणत्याही परिस्थितीत मला सौर पंप हस्तांतरण, विक्री, तांत्रिक बदल करण्याची परवानगी नाही याची मला जाणीव आहे.
 • सौर पंपाची कोणतीही साधने चोरी / नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास घटना घडलेपासून मी प्रथम माहिती अहवाल 15 दिवसांच्या आत जवळच्या पोलिस ठाण्यात दाखल करीन व महाऊर्जा कार्यालयाकडे अहवाल देण्याची जबाबदारी स्वतःची राहील.
 • चोरीचा / नैसर्गिक नुकसान अहवाल दाखल न केल्यास कदाचित नुकसान भरपाई मिळणार नाही याची मला जाणीव आहे.
 • सोलर पंपाची देखभाल व दुरुस्तीचा कालावधी ५ वर्षाचा आहे. या निर्धारित कालावधीत सौर पंप नादुरूस्त झाल्यास सौर पंपाची दुरुस्ती व देखभाल ही ठेकेदाराची जबाबदारी आहे आणि ती विनामूल्य आहे. या कालावधीत पंप नादुरूस्त झाल्यास दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर त्वरित संपर्क करून माहिती देण्याची जबाबदारी माझी आहे.
 • मी या सौर पंपाच्या स्थापित रचनेमध्ये कोणतेही बदल करणार नाही, असे झाल्यास झालेल्या नुकसानीस मी जबाबदार राहील,
 • काही तांत्रिक कारणांमुळे किंवा सौर पंप बंद झाल्यास सौर पंपातील त्रुटीमुळे किंवा अशा अपयशामुळे शेती उत्पादनांच्या नुकसानीस महाऊर्जा कार्यालय जबाबदार असणार नाही.
 • महावितरणकडून पारंपरिक वीज खरेदी बंधन (आरपीओ) अंतर्गत या सौर पंपाद्वारे निर्माण झालेली सौर उर्जा या बंधपूर्ततेसाठी वापरण्यास मी मान्यता देतो. वरील सर्व नियम व शर्ती माझ्या तसेच माझ्या वारसांवर बंधनकारक असतील.
 • आज मी रोजी सौर पंपाचे मिळणेसाठी हे हमीपत्र राजीखुशीने देत आहे.
 • वरील माहिती मला समजली असून / मला समजावून देण्यात आली असून मी कोणत्याही दडपणाशिवाय ते मान्य करीत आहे.

वरील माहिती आवडल्यास  आपल्या मित्रांना व जवळील शेतकरी बांधवाना नक्की शेयर करा आणि अशाच नाव नवीन योजनांच्या माहितीसाठी  किसान योजना  संकेतस्थळालाभेट देत रहा.

 

WhatsApp
Facebook
Telegram

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *