PM Kisan Yojana: शेतकरी बांधवांसाठी खुशखबरी, पी.एम किसानचा १४ व्या हप्त्याची तारीख जाहीर

PM Kisan Yojana: शेतकरी बांधवांसाठी खुशखबरी, पी.एम किसानचा १४ व्या हप्त्याची तारीख जाहीर

PM Kisan 14th Installment : पी.एम किसान १४ वा हप्ता

 

       देशात भरपूर लाभदायक व कल्याणकारी योजना अंतर्गत गरजवंत व गरीब शेतकऱ्यांसाठी  वेगवेगळा लाभ दिला जातो. त्यात शेतकऱ्यांसाठी “किसान सन्मान निधी” हि योजना राबविण्यात येत आहे.

“PM Kisan Sanman Nidhi” योजना केंद्र सरकार कडून चालवली जाते. ज्यामध्ये पात्र शेतकऱ्यांना वर्षातुन तीन हप्त्यामध्ये २-२ हजार रुपये म्हणजेच वर्षाचे ६०००/- हजार रुपयाची आर्थिक मदत पात्र शेतकऱ्यांना केली जाते, आतापर्यन या योजनेतून शेतकऱ्यांना एकूण १३ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल गेले आहेत

13 वा हप्ता मागील २७ फेब्रवारी २०२३ रोजी स्वतः प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जवळपास ८ करोड पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात DBT द्वारे पैसे पाठवले गेले होते. आणि आता १४ व्या हप्ताची प्रतिक्षा देखील संपली आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात १४ वा हप्ता DBT द्वारे जमा केला जाईल त्याची तारीख देखील ठरली गेली आहे.

PM Kisaan १४ व्या हप्त्याची तारीख:

 

१४ व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुश खबर आली आहे . १४ वा हप्ता वितरण तारीख ठरली आहे. 

सरकारी संकेतस्थळावरील माहितीनुसार २७ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता स्वतः प्रधानमंत्री जनतेसोबत मन कि बात संवाद साधून यावेळी ८.५ करोड पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात २७ जुलै २०२३ रोजी “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी” योजनेचा १४ वा हप्ता २००० रुपये DBT द्वारे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.

PM Kisan १४ व्या हप्ता मिळण्यासाठी काय करावे:

 

प्रधान मंत्री किसान सन्मान निधीचा १४ वा  हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांना KYC करणे बंधनकारक आहे.

KYC करण्यासाठी https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx या लिंक वर जाऊन आपला आधार नंबर टाकून KYC करून घ्यावी

PM Kisan निधी योजनेचा निधी DBT म्हणजेच  डायरेक्ट बेनाफिट ट्रान्स्फर आधार संलग्न खात्यात केला जातो त्यामुळे तुमचे खाते आधार संलग्न (आधार लिंक ) असणे बंधन कारक आहे .त्यामुळे आपले खाते आधार लिंक करून घ्यावे.

आपण https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus_New.aspx या लिंक वर जाऊन आपल्या PM Kisan निधी ची स्थिती तपासून घेऊ शकता

वरील माहिती आपल्या शेतकरी बांधवाना नक्की शेयर करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या किसान योजना संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.

Facebook
WhatsApp
Telegram

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *